Download App

Maharashtra Rain : राज्यात अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान, बळीराजाचा पाय खोलात

Unseasonal rain in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. या पावसाने शेतीतील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर फळबागा, भाजीपाला पिक या सर्वांच्या नुकसानीने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

रिफायनरी प्रकल्प! महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच, फडणवीसांची स्पष्टोक्ती

ज्या जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला आहे त्यामध्ये विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशिम या जिल्ह्याना अवकाळीसह गारपीटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर इकडे मराठवाड्यात देखील हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

यवतमामध्ये तर बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल पूर्ण भिजला. यामध्ये सोयाबीन आणि हरभरा यांचा समावेश होता. त्यामुळे विक्री आधीच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. दरम्यान या अगोदर झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय औपचारिकतेत अडकलेले असताना पुन्हा आता शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे.

Tags

follow us