Download App

Vaishnavi Hagawane Case : आधी प्रश्न विचारला नाही म्हणून रुपाली चाकणकर चक्क चॅनेलवर रुसल्या! नेमकं काय घडलं?

एका वृत्त वाहिनीने रुपाली चाकणकरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आधी प्रश्न विचारला नाही म्हणून चाकणकर चक्क रुसल्याचं समोर आलं.

Vaishnavi Hagawane Suicide Case : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. दरम्यान, एबीपी माझाने या प्रकरणावर चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, रोहिणी खडसे यांना आधी बोलायला दिल्याने रुपाली चाकणकर चक्क रुसल्याचं अ‍ॅंकर प्रसन्न जोशींनी सांगितलं.

लव्ह मॅरेज केलं पण रोजच भांडणं; मुख्याध्यापिका पत्नीनेच नवऱ्याचा… धक्कादायक खुनी कांड समोर 

गेस्ट अवर या एबीपी माझाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच वैष्णवी हगवणेंचे आई-वडील सहभागी झाले होते. रोहिणी खडसे, अंजली दमानिया यांनी आपले विचार मांडले. प्रसन्न जोशी हेही देखील आवेशात बोलत होते. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांचा राजीनामा देऊन पक्षातून हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. मात्र, स्वपक्षीयांवर अजित पवारांनी कुठलीच कारवाई केली नाही. एक बाप म्हणून अजितदादांना वैष्णवी यांच्या आई-वडिलांना फोन करता येत नाही का? अशा प्रश्नांची सरबत्ती प्रसन्न जोशींनी केली.

दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असतांनाच अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकरांचा उल्लेख करताच अ‍ॅंकर जोशी संतापले. ते म्हणाले, आम्ही या कार्यक्रमासाठी रुपाली चाकणकरांना आमंत्रित केलं होतं. मात्र, वैष्णवीच्या आई-वडिलांनतर मला बोलू द्यायला पाहिजे होतं, असं म्हणत त्या डिस्कनेक्ट झाल्या… त्यांनी थेट रुसवा धरला… रुपाली चाकणकर चॅनेलवर रूसतात.. असं कोण वागतंय..? इकडे काय गंमत चाललीय..? या बाईंचा राग काय तर वैष्णवींच्या आई-वडिलांचं बोलणं झाल्यावर आधी मला का बोलू दिलं नाही? वैष्णवी यांच्या आई-वडिलानंतर त्यांना बोलू दिलं नाही म्हणून त्यांनी रुसवा धरला.. महिला आयोगाच्या अध्यक्षा चॅनेलवर रूसतात….आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवतो, तुमची प्रतिक्रिया घेतो, मात्र, तुम्ही रुसता, अशा शब्दात पत्रकार जोशींनी चाकणकारांना चांगलेच फटकारले.

उस्मानाबाद नाही आता धाराशिव रेल्वे स्टेशन; जीआर निघाला, खासदार निंबाळकरांनी दिली माहिती 

रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
वैष्णवीच्या आई-वडिलांसोबत आम्ही आहोत. वैष्णवीला आम्ही न्याय मिळून देऊ… अशा प्रकारे एखाद्या मुलीचा सासरी छळ होत असेल आणि हत्येपर्यंत प्रकरण जात असेल तर हा चिंतेचा विषय आहे. जे आरोपी आहेत, त्यांची अद्याप पक्षातून हकालपट्टी का झाली नाही? स्वपक्षीयांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं खडसे म्हणाले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?
मला वैष्णवीच्या आई-वडिलांचा जरा राग आहे. मुलीला त्रास होतोय, तिचा छळ केला जातोय, हे ठाऊक असतांनाही त्यांनी अ‍ॅक्शन घेतली नाही? समोरचा किती धनदांडगा असला तरी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला पाहिजे होती, असं त्या म्हणाल्या. तसेच अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली.

follow us