Rupali Chakankar On Pregnant Woman Death at Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपडेट आहे. राज्य सरकारच्या समितीचा प्राथमिक अहवाल (Pregnant Woman Death) सादर करण्यात आलेला आहे. पुणे पोलीस आयुक्तांसमोर प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बैठक पार पडली. हो…दीनानाथ मंगेशकर रूग्णालय गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार आहे, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
राज्य महिला आयोगासमोर याप्रकरणी आज राज्य सरकारच्या समितीने अहवाल सादर केलेला आहे. यावर बोलताना रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय की, आज पुणे पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक पार (Pune News) पडली. बैठकीपूर्वी मी भिसे कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली. कोणतीही व्यक्ती रूग्णालयात गेल्यानंतर ते वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांना सांगतात, जेणेकरून उपचार चांगला मिळावा. पेशंट 15 मार्चपूर्वी डॉ. घैसास यांना भेटलेले होते. त्यांना रूग्णाची मेडिकल हिस्टरी माहित होती. ही माहिती वैयक्तिक ठेवायची असते, परंतु घटना घडल्यानंतर. रूग्णालयाच्या समितीने आपल्या बचावासाठी ही माहिती सर्वांसमोर मांडली, याचा रूपाली चाकणकर यांनी निषेध केलाय. रूग्णालयाने मगरूरी केली, हलगर्जीपणा केलाय. यामुळे रूग्णालय दोषी आहे. साडेपाच तासांचा अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने रूग्णाचा मृत्यू झालाय, असं चाकणकर यांनी म्हटलंय.
Video : टेस्ला टेस्ला काय घेऊन बसलात; चीनच्या ई-कार्स मॉडेल्सनं उडवलाय नुसता धुराळा…
राज्य महिला आयोगाला त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य महिलांनी हे पत्र दिलं आहे, रूग्णाची वैयक्तिक माहिती अहवालात दिली, यासंदर्भात दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाला समज दिली जाईल, असं देखील यावेळी रूपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. एक तारखेला रूग्णालयात पेशंट गेल्यानंतर नऊ वाजून एक मिनिटांची पेशंटची एन्ट्री आहे. त्यानंतर त्यांनी पेशंटच्या ऑपरेशनची तयारी केली स्टाफला सूचना दिल्या, परंतु रूग्णाला ऑपरेशनसाठी घेवून जाण्याअगोदर दहा लाखाची मागणी केली. ही गोष्ट पेशंटसमोरच घडत होती. नक्कीच दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले. पण याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. तब्बल पाच तासांनी अडीच तासानंतर पेशंट बाहेर पडलं. पण मंगेशकर रूग्णालयाने पेशंटवर उपचार केले नाही. यादरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर पेशंटची डिलिव्हरी झाली. परंतु खचून गेल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाला. सूर्या रूग्णालयाकडून पेशंटवर चांगले उपचार झालेत, हे सर्व कुटुंबाच्या घरातील सदस्यांनी अर्जात मांडलं आहे.
रोहित पवारांना शिंदेंचा दे धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची शिंदेंसोबत गुप्त बैठक
राज्य शासनाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल आलाय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल या तिघांचा अहवाल देण्यात आलाय. हा मृत्यू माता मृत्यू असल्याने सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल समोर येईल. तिन समिती यासाठी काम करत आहे. धर्मादायी आयुक्तांचा अहवाल सकाळपर्यंत समोर येईल. पेशंटला प्रतिसाद देणं, उपचार करणं गरजेचं होतं. परंतु ते मंगेशकर रूग्णालयाने केलं नाही, असा ठपका राज्यशासनाच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे. तिन्ही समित्यांचे एकत्रित अहवाल आणि मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रार यावर उद्या अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार आहेत.