Rupali Chakankar यांना ईव्हीएमची पूजा भोवली; सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Rupali Chakankar यांना ईव्हीएमची पूजा भोवली;  सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Case Filed Rupali Chakankar due to Worship of EVM Machine : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वातावरणात गुन्हा दाखल ( Case Filed ) झाला आहे. याचं कारण ही तसचं आहे. चाकणकर यांना ईव्हीएम मशीनची पूजा ( Worship of EVM Machine ) करणं भोवलं आहे. त्यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकशाहीच्या उत्सवात सेलिब्रेटींनी बजावला मताधिकार

आज ( 7 मे ) ला देशासह राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये राज्यातील तब्बल 11 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रत्येक मतदारसंघात तेथील उमेदवारांसह दिग्गज नेत्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी धायरी येथील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्या होत्या.

नगरकरांमध्ये निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद; मोदींच्या सभेतील गर्दीने लंकेंना टेन्शन

यावेळी मतदान करण्याअगोदर चाकणकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली. मात्र अशा प्रकारे पूजा करणं त्यांना चांगलचं भोवलं आहे. कारण या प्रकरणी त्यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वातावरणात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये असलेल्या चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज