EVM चोरीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल; पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार, DYSP निलंबित

EVM चोरीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल; पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार, DYSP निलंबित

पुरंदर : तहसिलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे सुरक्षेतील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत संपूर्ण अहवाल 12 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. (Election Commission has ordered the suspension of Saswad Tehsildar and Deputy Superintendent of Police in connection with EVM theft.)

PM मोदींची नेहरुंवर टीका! शरद पवारांनी चांगल्या कामाचा दाखलाच दिला…

लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना या निवडणुकांच्या तयारीत प्रशासन गुंतले आहे. अशातच पुरंदर तालुक्यातील सासवड येथून काल ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांनंतर सोमवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला होता. यानंतर प्रशासनाने पोलीस स्थानकात धाव घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरुन नेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Letsupp Image (2)

छगन भुजबळांना दिल्लीचे वेध… पण अजितदादांपुढे वेगळाच पेच!

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत. येथील 40 ईव्हीएम मशीनपैकी फक्त एक डेमो युनिट चोरट्यांनी चोरून नेले. बाकीचे मशीन सुरक्षित आहेत. आमची टीम या प्रकरणी तपास करत आहे, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विविध ठिकाणी पथके तैनात केली. अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणी पुरंदरचे तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube