PM मोदींची नेहरुंवर टीका! शरद पवारांनी चांगल्या कामाचा दाखलाच दिला…

PM मोदींची नेहरुंवर टीका! शरद पवारांनी चांगल्या कामाचा दाखलाच दिला…

Sharad Pawar On Pm Modi : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर सडकून टीका केली. भारतीय लोकं आळशी असल्याचं मत पंडित नेहरुंचं होतं, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर दिल्लीत आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या टीकेची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी बोलताना पंडित नेहरुंच्या चांगल्या कामाचा दाखल देत दिवंगत नेत्यावर अशी टीका करणं अयोग्य असून पंतप्रधान देशाचा असतो, पक्षाचा नाही, अशी परखड टीका केली आहे.

बंडातील नायकांवर मनसेचा निशाणा; अजितदादांच्या खांद्यावरुन भुजबळ, तटकरे अन् वळसे पाटलांवर वार

शरद पवार म्हणाले, दिवंगत नेत्यावर अशी टीका करणं अयोग्य आहे. पंतप्रधान हा देशाचा असतो पक्षाचा नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकून दुख: झालं. पंडित नेहरुंचं योगदान नाही हा दावा चुकीचा आहे. भारतात लोकशाहीची सुरुवात पंडित नेहरुंपासून झाली असून नेहरुंनी देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना दिली असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच लाल बहादुर शास्त्री, पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांनी देशासाठी चांगलं काम केलं आहे, राजकारणात विविध विचारसरणी असतात हे मान्य आहे पण महान नेत्यांचं योगदान नाकारणं योग्य नाही, असं परखड मत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेवर व्यक्त केलं आहे.

‘खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट जाहीर केलंय’; जयंत पाटलांनी सरकारवर डागली तोफ

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरु यांनी भाषण केलं होतं. हे भाषण त्यांनी लाल किल्ल्यावरुन केलं होतं. यावेळी बोलताना नेहरु म्हणाले होते की, भारतात मेहनत करण्याची सवय कोणाला नाही. आपण एवढी मेहनत करीत नाही. जगातील इतर देश युरोप, जपान, चीन, अमेरिका आपल्यापेक्षा अधिक मेहनत करतात, असं नेहरु आपल्या भाषणात म्हणाले होते. म्हणजे, नेहरुंच्या मते भारतीय लोकं आळशी होते, असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा नेहरुंवर टीका केली.

तसेच इंदिरा गांधी यांचंही भारतीयांबद्दल असंच मत होतं. इंदिराजींनी म्हटलं होतं की, जेव्हा संकट येतात तेव्हा आपण डगमगतो, काँग्रेसचे लोकं भारतीय लोकांना असचं समजत आहेत. आजही त्यांचे विचार असेच आहेत. काँग्रेसला नेहमी एकाच कुटुंबावर विश्वास होता. त्यापुढे ते काहीच विचार करु शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी आघाडी केली त्यानंतर पुन्हा एकला चलोरे चा नारा देण्यात येत आहेत..पण इंडिया आघाडीचं नियोजनच बिघडलं असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज