PM Modi : असं घर लहानपणी मलाही मिळालं असतं तर… गृहप्रकल्पाच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi : असं घर लहानपणी मलाही मिळालं असतं तर… गृहप्रकल्पाच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Solapur Visit : आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Modi Solapur Visit) देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मी हे घरं बघून आलो. त्यावेळी मला देखील वाटलं की, मलाही लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर. असं म्हणत पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Musafiraa Trailer: प्रेम अन् मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सोलापुरातील सिद्धेश्वर महाराजांना वंदन केलं. ते म्हणाले की, 22 जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणाचा बहुप्रतिक्षित क्षण जवळ आला आहे. त्यासाठी माझे सध्या अनुष्ठान सुरू आहे, ही भाग्याची गोष्ट आहे की, नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट देत माझ्या अनुष्ठानला सुरुवात झाली. तर याच राम भक्तीमय वातावरणामध्ये महाराष्ट्रातील गरीब परिवारांना त्यांचे घर मिळत आहे.

‘संघर्ष अन् बरच काही’, मोहनलालच्या ‘मलैकोटै वालिबन’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

त्यामुळे ते सर्वजण आणि देशभरातील सर्व नागरिकांनी 22 जानेवारीला सायंकाळी रामासाठी एक दिवा लावण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या कौतुकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही माझं कौतुक केलं हे ऐकायला एक राजकारणी म्हणून चांगलं वाटतं. मात्र महाराष्ट्राचं नाव हे येथील जनतेमुळे आणि शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारमुळे पुढे जात आहे. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारचे कौतुक केलं.

‘संघर्ष अन् बरच काही’, मोहनलालच्या ‘मलैकोटै वालिबन’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मी हे घर बघून आलो त्यावेळी मला देखील वाटलं की, मलाही लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर. असं म्हणत पंतप्रधान मोदी यावेळी भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. हे सर्व गोष्टी पाहिल्या की मनाचा समाधान होतं की, हजारो कुटुंबांची स्वप्न साकार झाल्याने त्यांचे मिळणारे आशीर्वाद ही माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे.

‘पात्रता असूनही सुप्रियाला बाजूला ठेवलं पण, कार्यकर्त्यांना संधी दिली’; पवारांनाही नाकारलं घराणेशाहीचं राजकारण

ही घर मिळवण्यासाठी या लोकांनी अत्यंत कष्ट घेतले आहेत त्यामुळेच विजाप्रमाणे या प्रकल्पाच्या उद्घाटनाला म्हटलं होतं की चावी द्यायला ही मीच येईल त्याचप्रमाणे मी आलो आहे कारण मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे. त्यामुळे आता तुम्ही घेतलेले कष्ट तुमच्या पुढच्या पिढीला घ्यावे लागणार नाहीत. त्यामुळे 22 जानेवारीला या घरांमध्ये तुम्ही जो दिवा लावाल तो तुमच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार दूर करण्याची प्रेरणा ठरेल. तसेच तुमच्या सगळ्यांचा आयुष्य आनंदाने भरून जावं हीच माझी श्रीरामाकडे प्रार्थना आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज