बंडातील नायकांवर मनसेचा निशाणा; अजितदादांच्या खांद्यावरुन भुजबळ, तटकरे अन् वळसे पाटलांवर वार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (6 जानेवारी) मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालावर शरद पवार गटातून भाजप आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली जात आहे. याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांकडूनही निवडणूक आयोगाला लक्ष केले जात आहे. पण त्याचवेळी मनसेने मात्र या निर्णयावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय अजितदादांचेच एक भाषण एक भाषण ट्वीट करत त्यांना बंडात साथ देणाऱ्या मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री दिलीप वळसे पाटील या प्रमुख नेत्यांवरही निशाणा साधला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे 4000 भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन, बबिता जीने शेअर केली खास पोस्ट
मनसेने यापूर्वी ट्विट करत म्हटले होते की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते.. असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ! अशी अजित पवारांवर टीका केली होती.
त्यानंतर आता ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…! असं म्हणत मनसेने अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती ती दिसून येत आहे.
Ahaan Panday : अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! मोहित सुरीसोबत शेअर करणार स्क्रीन
यामध्ये अजित पवार म्हणाले आहेत की, ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला. ज्यांच्या वडिलांनी तो पक्ष वाढवला. ज्या पक्षाची सुरुवात शिवाजी पार्कपासून करत महाराष्ट्राच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवला. त्यांच्याच पक्षाचे चिन्ह काढून घेतलं. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने दिला असला. तरी हा निर्णय जनतेला मान्य आहे का? याचा देखील विचार झाला पाहिजे. तसेच शिंदेंमध्ये धमक होती. तर त्यांनी नवीन पक्ष काढायचा होता. त्यांना कोणी अडवलं होतं? असा सवाल तेव्हा अजित पवारांनी केला होता.
त्यानंतर आताची परिस्थिती पाहता अजित पवारांनी देखील शिंदेंचीच री ओढली आहे. अजित पवार यांनी गत जुलै महिन्यात छगन भुजबळ, दिलीव वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील आणि शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला. आता निवडणूक आयोगानेही शिंदेप्रमाणेच राष्ट्रवादीचाही निकाल दिला आहे.