आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, जातीवाचक शिवीगाळ केल्यानं ॲट्रॉसिटी दाखल

  • Written By: Published:
आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, जातीवाचक शिवीगाळ केल्यानं ॲट्रॉसिटी दाखल

Atrocity case filed against MLA Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली आहे. त्यानंतर आता उल्हासनगर- हिल लाईन पोलिस ठाण्यात (Ulhasnagar- Hill Line Police Station) गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या द्वारली गावात एका जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

World Cancer Day: आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरासाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘मला तुझा…’ 

आमदार गणपत गायकवाड यांनी (शुक्रवारी) शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गायकवाड यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जागेच्या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होत. ज्या जागेवरून वाद सुरू होता. त्या जागेच्या मालकाच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं आमदार गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

World Cancer Day: आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरासाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘मला तुझा…’ 

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात 31 जानेवारी रोजी जमिनीवरून वाद झाला होता. भाजप आमदार गायकवाड यांचा जमीन मालकाच्या कुटुंबाशी वाद झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मालक मधुमती एकनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना आमदारासह सात जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली. जातीचा उल्लेख करून आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, तुम्ही कधीच सुधारणार नाही. आम्ही तुम्हाला कधीही पुढे जाऊ देणार नाही. तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीसाठी कोणत्याही न्यायालयात जा, असं गायकवाड म्हणाले होते. त्याचबरोबर अनेकांनी जातीवाचक शिवीगाळही केली.

या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह आमदार जितेंद्र पारीख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्याविरुद्ध हिल-लाइन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज