Maratha Reservation : ‘आरक्षण मागणारे रयतेतील मराठे, विरोध करणारे…’; आंबेडकरांचं मोठं विधान

  • Written By: Published:
Maratha Reservation : ‘आरक्षण मागणारे रयतेतील मराठे, विरोध करणारे…’; आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील (Maratha Reservation) लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. तर कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपलं आदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांन घेतली. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आज प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाष्य केलं.

शुभमनच्या शतकानंतर टीम इंडियाचा डाव 255 धावांवर आटोपला, इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य 

आज एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रकाश आंबेडकरांना मराठा आरक्षणाबाबत सवाल विचारला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश कायदेशीर कसोटीवर टिकल्यानंतरच तो मान्य होईल. कारण, ओबीसी आणि मराठा हे दोन गट एकमेकांविरोधात हरकती नोदंवत आहे. आमची भूमिका आहे की, मराठा समाजाची गेल्या 70 वर्षातील सद्यस्थिती पहावी लागेल. त्यांच्या आजच्या परिस्थितीला तेच जबाबदार आहे. मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. ते शिवाजी महाराजांपासून राहिलेले आहेत. आज ज्यांना निजामी मराठे म्हटलं जाते, ते मुघलांबरोबर राहिले होते. जे आता आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत. जात हा दोघांमधील समान दुवा आहे आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असं नाही, असे आंबेडकर म्हणाले.

नगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग 

पुढे बोलताना ते म्हणाले, रयतेचे मराठे आणि मोगलाई मराठे यांच्यात आजही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. त्यांच्यात सामाजिक एकत्रिकरण झालेलं नाही. त्यामुळं गरीब मराठ्यांना वेगळं काढले जाऊ शकते का? तर तशी शक्यता आहे. पण, त्यासाठीच जनतेनं आम्हाला सत्ता द्यावी, असं आवाहनआंबेडकर यांनी केलं.

बहिष्कार टाकण्याचा निषेध
मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला केलं. त्याचा आंबेडकरांनी निषेध केला. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये कटुता आहे. हे नाकारता येत नाही. पण कोणत्याही समाजाचे नाव घेऊन अजून भांडणे वाढवणे, ही वृत्ती अतिशय घातक आहे. मी त्याचा निषेध करतो. कारण, वाळीत टाकणं आणि राहमं हे मी स्वत: पाहिलेलं आहे. मतभेद आहेत, हे मी मान्य करतो. पण, शत्रुत्व असता कामा नये, असं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज