Maratha Reservation : माझा उपचार कोणता? मनोज जरांगे पाटलांनी दिलं उत्तर…

Maratha Reservation : माझा उपचार कोणता? मनोज जरांगे पाटलांनी दिलं उत्तर…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन आरक्षण देण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेतलं होतं. अध्यादेशात काही दुरुस्त्या असल्याने त्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी पाणी सोडलं असून उपचारही घेणं बंद केलं आहे. आता ‘मराठा आरक्षण हाच माझा उपचार’ असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

ODI World Cup : न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी तर गोलंदाज काइल जेमिसन बाहेर

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण हाच माझा उपचार असून आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे, माझा कुणालाही त्रास नाही, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये, म्हणून आमच्यावर किती अन्याय कराल? आता आमच्याकडेही पण बघा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

G20 Summit Video : भारत मंडपममध्ये साचले पाणी? कॉंग्रेसकडून जोरदार टीका; ‘विकास तरंगतो…’

ओबीसीवर देखील अन्याय करू नका आणि मराठा समाजावर पण अन्याय करू नका, सरसकट आरक्षण द्या, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडत आहे, सर्वपक्षीय नेते मराठा समाजाला किती साथ देतात, किती प्रेम करतात, हे आज उघड होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात समजून सांगू, मग येतील ते आणि समजून सांगतील, फक्त चर्चा करण्यासाठी येतात, आमचे ऐकत तर नाही, मग मी का ऐकायचे? असा खडा सवालही मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.


नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’

तुमच्याकडं निजाम नव्हते तर जायंच घेऊन :
महाराष्ट्राच्या मराठ्याला निजाम कुणबी दाखला देतोयं? असं काही लोकं म्हणताहेत, आता मला माहितीये का निजाम तुमच्याकडे होता की नाही? तुमच्याकडे निजाम नव्हता तर 8-15 दिवसांसाठी घेऊन जायचा, काही लोकं काहीही काढतात, निजाम इकडं होता का इंग्रज होते का? तुमच्याकडे निजाम होता, आमच्याकडे नव्हता तर मग तुमच्याकडे इंग्रज होते तर द्यायचे आमच्याकडे लोटून द्यायचे मग? पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का? सरसकट महाराष्ट्रात सर्वच मराठा आले आहेत, मला काही सांगण्यापेक्षा सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी ताकद लावावी, या शब्दांत मनोज जरांगे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube