नगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग

नगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग

Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात अमाेल कुमार, महादेव घुगे, लेप्टनंट पॅट्रिक कॅमेराॅन, सलाेनी लव्हाळे, प्रीतम रांका, मिनी बाबेरवाल यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.

नगर रायझिंग फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत हजाराे नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाले. स्पर्धेत १० किलोमीटर व २१ किलोमीटर मॅरेथॉनला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनच्या आशाताई फिरोदिया यांनी, तर ४ किलोमीटरच्या मॅरेथॉनला ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची टीम व कलर्स मराठी वाहिनीवरील लाेकप्रिय मालिका ‘काव्यांजली-सखी सावली’तील कलाकारांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, नगर रायझिंगचे संचालक संदीप जाेशी, ‘साेहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधीक्षक प्रशांत खैरे, नगर रायझिंगचे ट्रस्टी डॉ. सतीश सोनवणे, डॉ. श्याम तारडे, अॅड. गौरव मिरीकर, नगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदी उपस्थित होते.

शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन प्रकारांत झाली. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, चेस नंबर, भेट वस्तू व पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अ‍ॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, एस. एस. माेबाईल शाॅपी, सी. टी. पंडोल अ‍ॅण्ड सन्स, रिव्होल्ट, बी. यू. भंडारी व आयडीएफसी फर्स्ट बँक हे सह प्रायोजक होते.

1 पॅनवर 1000 अकाउंट… ओळखपत्राविना करोडो रुपयांचे व्यवहार, अशा प्रकारे पेटीएम आले आरबीआयच्या रडारवर

‘यांनी’ वेधले लक्ष
दिव्यांग (अंधत्व) असलेले अमरजितसिंग चावला व ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी २१ किलोमीटर प्रकारात सहभाग घेत शर्यत पूर्ण केली. ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अंध धावपटू ठरले. याबद्दल दोन्ही अंध धावपटूंचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी या स्पर्धेत सहभागी हाेत या मॅरेथाॅनचा आनंद लुटला. यात माजी आमदार नरेंद्र घुले, क्षितिज घुले आदी मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाले हाेते.

‘हे’ आहे स्पर्धेचे विजेते
२१ किलाेमीटर
युवक
प्रथम : प्रेम काळे
द्वितीय : गणेश देवकर
तृतीय : विशाल पुंड

ज्येष्ठ
प्रथम : संजय शेळके
द्वितीय : जनार्धन गिते
तृतीय : रवींद्र जाधव

युवती
प्रथम : इरा फातिमा
द्वितीय : सुजाता पायमाेडे
तृतीय: उज्ज्वला राजे

१० किलाेमीटर
युवक
प्रथम : अमाेल कुमार
द्वितीय : प्राशिक थेटे
तृतीय : दत्ता मधे

ज्येष्ठ
प्रथम : महादेव घुगे
द्वितीय : महेश मुळे
तृतीय : डाॅ. श्याम तारडे

युवती
प्रथम : सलाेनी लव्हाळे
द्वितीय : सुनीता भिंगारदिवे
तृतीय : चैताली गांधी

ज्येष्ठ महिला
प्रथम : प्रीतम रांका
द्वितीय : प्राची पवार
तृतीय : नेहा पंडित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube