चाकणकरांविरूद्ध बोलणं पडलं महागात; रूपाली पाटील ठोंबरेंना राष्ट्रवादीची नोटीस, सात दिवसांची मुदत
Rupali Thombre Patil यांना चाकणकर यांच्यावर माध्यमांतून टीका करणं चांगलच महागात पडलं आहे. कारण यासाठी राष्ट्रवादीने त्यांना नोटीस बजावली आहे.
Speaking against Rupali Chakankar cost her dearly NCP issues notice to Rupali Thombre Patil : राष्ट्रवादीमध्ये पुण्यात सध्या रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद सुरू आहे. रूपाली पाटील यांच्याकडून चाकणकर यांच्यावर माध्यमांतून टीका केली जात आहे. मात्र ही टीका करण रूपाली ठोंबरे पाटील यांना चांगलच महागात पडलं आहे. कारण यासाठी राष्ट्रवादीने रूपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
माझ्या मताशी अजितदादाही सहमत… अहवातील दोषींवर कारवाई होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
पाटील ठोंबरेंना पक्षाकडून सात दिवसांची मुदत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये महिला नेत्यांमधील वाद चांगलाच चिघळला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्या वादावर अखेर पक्षाने दखल घेतली असून, ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर रूपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलनही केले होते. चाकणकर यांनी संबंधित तरुणीचे चारित्र्यहनन केल्याचा ठोंबरे यांचा आरोप होता. या प्रकरणामुळे दोघींमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष रंगला होता.
धक्कादायक! बीड नगरपालिकेच्या छतावर आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह, संपूर्ण परिसरात खळबळ
यानंतर, पक्षाचे संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी रूपाली ठोंबरे यांना नोटीस पाठवली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षशिस्त भंग झाल्याचे नमूद केले आहे. “आपण पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या पदावर असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला प्रदेशाध्यक्ष यांच्याबद्दल माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण द्यावे,” असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
नोटीस अजित पवार, सुनीलआणि प्रफुल्ल पटेलांनाही पाठवली
दरम्यान, यावर ठोंबरे यांची फेसबुकवर प्रतिक्रिया आली असून त्यांनी नोटीस फोटो टाकत म्हणाल्या की, आज रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा?, अस ठोंबरे म्हणाल्या आहेत.
