Rupali Chakankar यांच्याबाबात अश्लील पोस्ट; पुणे पोलिसांनी उचलल मोठं पाऊल
Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांच्याबाबत सोशल मिडीयावर पोस्टद्वारे अश्लील कटेंट टाकण्यात आला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 3 जणांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांचा भाऊ संतोष बबन बोराटे यांनी त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चेन्नईतील मिचॉन्ग वादळात 24 तास अडकला आमिर खान, असे झाले रेस्क्यू
या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. सांगलीचा जयंत पाटील, आणि पुण्याचा प्रदीप कणसे अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रामनाथ पोकळे ( अतिरिक्त आयुक्त गुन्हे) यांनी यावर पत्रकार परिषद घेतली आहे.
‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी
त्यांनी सांगितलं की, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर एक पोस्ट टाकली होती या पोस्टवर तीन आरोपींनी अश्लील कमेंट केल्या होत्या या तीनही जणांची नावे ही जयंत पाटील जो सांगलीतील आहे. दुसरा वसंत खुळे परभणीतील आहे. तर तिसरा प्रदीप कणसे हा पुण्यातील आहे. दरम्यान ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे. की कोणत्याही महिलांच्या बाबतीत अशा प्रकारचा घटना घडू नयेत जर अशा घटना घडत असतील तर संबंधित महिलांनी त्या पुढे येऊन पोलिसांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचं यावेळी अतिरिक्त आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे यांनी सांगितलं.
दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या पोस्टवर अशा प्रकारे अश्लील कमेंट्स येत असतील तर समान्य महिलांचं काय? त्यांच्यावर सोशल मिडीयावर येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.