रोहित पवारांना शिंदेंचा दे धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची शिंदेंसोबत गुप्त बैठक

रोहित पवारांना शिंदेंचा दे धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची शिंदेंसोबत गुप्त बैठक

Ram Shinde Meeting With Congress And NCP Corporator : अहिल्यानगर – कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar), असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धुळ चाखवली. मात्र, आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसच्या (Congress) तीन नगरसेवकांची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासोबत रविवार रात्री गुप्त बैठक पार पडली असल्याचे समजते आहे. या बैठकीत कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

ब्लॅक मंडे! 10 सेकंदात 19 लाख कोटी रुपये बुडाले, सेन्सेक्स आणि निफ्टीत 5 टक्क्यांनी घसरण

कर्जात जामखेडमध्ये (Ahilyanagar) 2019 च्या निवडणुकीपासून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे, असा थेट सामना रंगला आहे. बारामतीचे पार्सल म्हणून शिंदे यांनी रोहित पवारांवर थेट टीका देखील केली आहे. मात्र, दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पराजयांनंतर देखील शिंदे आणि पवार यांच्यामधील शाब्दिक युद्ध सुरूच राहिल्याचे पाहायला (Maharashtra Politics) मिळाले. यातच आता रोहित पवारांच्या बालेकिल्ल्याला खुद्द त्यांच्या पक्षातील नगरसेवकांकडून सुरुंग लावला जात असल्याने येणाऱ्या काळात कर्जत नगरपंच्यतीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

शिंदेंच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक! ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला, ‘ त्या’ 16 परवानग्यांमुळे घोडं अडलं…

शिंदेंना शह देत पवारांनी मारली होती बाजी

आमदार रोहित पवार यांनी कर्जत (Karjat) नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजीचा सुरू समोर येऊ लागला. रोहित पवार यांच्याविषयी संतापाची भावना समोर आली.

सध्या राज्यात असलेल महायुतीच सरकार व त्यामध्ये सुरू असलेली इनकमिंग आणि रोहित पवार यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. हा सूर पाहत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नगरसेवकांसह काँग्रेसच्या काही नगरसेवकानी राम शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा राम शिंदे यांना साथ देऊन कामे मार्गी लावत विकास निधी मिळवायचा, असा निर्धार नगरसेवकांनी केला. रविवारी रामनवमीचे औचित्य साधत 11 नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. यामुळे रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube