Download App

उस्मानाबाद नाही आता धाराशिव रेल्वे स्टेशन; जीआर निघाला, खासदार निंबाळकरांनी दिली माहिती

या नामकरणासाठी खासदार ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर, त्यांच्या प्रयत्न सफल झाले

Osmanabad Railway Station Named Dharashiv : उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव (Dharashiv) धाराशिव करण्यात आलं नव्हतं. त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून सतत पाठपुरावा केला जात होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील

या नामकरणासाठी खासदार ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर, त्यांच्या प्रयत्न सफल झाले असून आज बुधवार रेल्वेकडून नाव बदलाचा जीआर काढण्यात आला आहे. या जीआरनुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आलं आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. पाठपुराव्याला यश…! अखेर उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नामकरण – आता धाराशिव रेल्वे स्टेशन. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे धाराशिव. हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे! असं ट्विट त्यांनी केलं आहे.

follow us