Dharashiv : धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट; राजकीय वादातून तरुणाची हत्या…
Dharashiv : धाराशिवमधील (Dharashiv Murder) भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील मतदान केंद्रानजीक तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीयं. यासंदर्भातील माहिती ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (OmRaje Nimbalkar) यांनी ट्विटरद्वारे दिलीयं.
भावपुर्ण_श्रद्धांजली
भूम तालुक्यातील पाटसांगवी गावचे आमचे शिवसेना पक्षातील सहकारी समाधान पाटील यांची मतदान केंद्र परिसरात निघृण हत्या.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो व त्यांच्या कुटुंबियांस दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..! pic.twitter.com/L8DJwK5q74
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) May 7, 2024
नेमकं काय घडलं?
समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. भूम तालुक्यातील पाटसांगवी इथला तो रहिवासी असून मागील अनेक दिवसांपासून दोन गटांमध्ये वाद सुरु होता. अखेर मतदानाच्या दिवशीच निमित्त झालं. मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यातील एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केला.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
गौरव अप्पा नाईकनवरे असं आरोपीचं नाव त्याने समाधान पाटील याच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूहल्ला केल्याने समाधान गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून समाधान पाटील याचा मृत्यू झाला.
प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
आधीपासूनच दोन गटांमध्ये वाद सुरु होता. अखेर या वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यामध्ये झालं. यामध्ये समाधान पाटील याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत झालेल्या समाधान पाटील याचा मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. यांसदर्भातील माहिती ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.