दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं

दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं

Radhakrushan Vikhe Patil News : अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) पुढे सरसावले आहेत. पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडंच राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnvis) अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे घातलं. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आज अहमदनगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी ते बोलत होते.

“माझ्याशी गाठ करणं सोपं नाही” दत्ता मामांच्या दमदाटीचा व्हिडिओ रोहित पवारांकडून व्हायरल

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याकडे सातत्याने लक्ष घातलं जातं. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने दोन प्रश्न आहेत. कुकडी साकळाई योजनेच्या कामाला सरकारकडून तांत्रिक मंजुरी देण्यात आलीयं, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीयं. तसेच पाणी परिषदेच्या माध्यमातून पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी सुमद्राला जातं ते गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणून अहमदनगर जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करावा, अशीही मागणी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे केलीयं.

ठाकरे, पवारांना सहानुभूती नाही, महाराष्ट्रात लाट मोदींचीच; चंद्रकांत पाटलांना ठाम विश्वास

‘अहिल्यादेवीनगर’ नामकरण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन…
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराच प्रश्न प्रलंबित होता. अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवीनगर व्हावं, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवीनगर केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube