एकनाथ शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेही कोट्याधीश; चार वर्षांत भरघोस संपत्ती वाढली!
Chatrapati Sambhajinagar Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. राज्यात विद्यमान मंत्री, राजकीय नेत्यांनी आपापले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या अर्जामध्ये राजकीय नेत्यांनी दर्शवलेल्या संपत्तीचा चांगलाच मोठा आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी छत्रपती संभाजीनगरातून (Chatrapati Sambhajinagar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली असून मागील चार वर्षांत त्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं
संदीपान भुमरे यांच्या मालमत्तेचे व्हॅल्यूएशन 5.70 कोटींपेक्षा अधिक आहे. मागील चार वर्षांत त्यांच्या संपत्तीत जवळपास अडीच पटीने वाढ झाली आहे. भुमरे यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मैदानात आहेत. चंद्रकात खैरे हे भुमरे यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत असून खैरे यांच्या संपत्तीत कमी प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
संदीपान भुमरे यांच्याकडे 28 लाख रुपयांची फॉर्च्यूनर कार तर खैरे यांच्याकडे 1979 मध्ये घेतलेली 20 हजारांची फियाट कार तर पत्नीच्या नावावर असलेली सफारी 50 हजार किंमतीची दाखवलेली आहे. तर भुमरे यांच्याकडे 45 तोळे सोने आणि खैरेंकडे 43 तोळे सोने आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे 2019 मध्ये 2 कोटींची संपत्ती होती. मात्र, मंत्री होताच त्यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांचा वादळी खुलासा! म्हणाले, माझा ‘तो’ प्लॅन झाला यशस्वी
संदीपान भुमरे यांची संपत्ती कोणत्या साली किती?
2014 साली संदीपान भुमरे यांची संपत्ती 4 कोटी रुपये एवढी होती. त्यानंतर 2019 साली भुमरेंकरे 2 कोटींची संपत्ती होती. आता 2024 साली भुमरेंकडे 5.70 कोटी एवढी संपत्ती आहे.
सुरतला निघालो तेव्हा ठाकरेंनी दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण मी…; CM शिंदेंनी सगळचं सांगितलं…
चंद्रकांत खैरेंची कोणत्या साली किती संपत्ती?
चंद्रकांत खैरे यांची 2014 साली 1.47. कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यानंतर 2019 साली खैरे यांच्याकडे 9 कोटी रुपयांची संपत्ती होती. आता चंद्रकांत खैरे यांच्याकडे 8.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असून मागील निवडणुकीत त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मैदानात उतरले असून एकनाथ शिंदे गटाकडून संदीपान भुमरे तर एमआयएमचे इम्तियाज जलीलही मैदानात आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येत आहे.