सुरतला निघालो तेव्हा ठाकरेंनी दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण मी…; CM शिंदेंनी सगळचं सांगितलं…

सुरतला निघालो तेव्हा ठाकरेंनी दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण मी…; CM शिंदेंनी सगळचं सांगितलं…

Eknath Shinde On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून भाजपसोबत (BJP) हातमिळवणी केली होती. चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदेंनी हे बंड केल्यानं मविआला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानभवनात मतदान सुरू असताना मी सुरतला निघालो. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, पण मी ती नाकारली, असं शिंदे म्हणाले.

Sukh Kalale : मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना तुम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट रचला होता? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, हे षडयंत्र किंवा कट नव्हता, तर उठाव होता. विधानभवनात राज्यसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना ही योजना केली. मी सर्व आमदारांना सांगितलं की, संजय राऊत यांना मत करा आणि सूरतसाठी निघालो.

देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा 

शिंदे म्हणाले, आम्ही संजय राऊत यांना पराभूत करू शकलो असतो, पण आम्ही तसे केले नाही. मी सुरतला जाईपर्यंत मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. वसईतील एका चहाच्या टपरीवर असतांना मी उद्धव ठाकरेंशी फोनवर बोललो. त्यावेळी , उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण आता खूप उशीर झाला, असं मी त्यांना सांगिलतं.

पवारांनी सीएम पदासाठी ठाकरेंचे नाव सुचवले नाही

मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण, ते खोटे बोलत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. शिवाय त्यांना मुख्यमंत्रीपदही ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचे होते. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचं हे शरद पवारांनी सूचवलं नाही. काही लोकांना पवार यांच्याकडे पाठवण्यात आलं होत. त्यांनी पवारांकडे ठाकरेंच्या नावाची शिफारस केली, असं शिंदे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube