प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) तिसऱ्या टप्प्यात (Satara Lok Sabha Election) मतदान होत आहे. या मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. मतदान विना अडथळा पार पडावे याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. याच दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार या मतदारसंघाबाहेरून आलेल्या कार्यकर्ते, जे व्यक्ती सातारा मतदारसंघातील नाहीत त्यांनी स्वतःहून येथून निघून जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

सातारा मतदारसंघात रविवारी सायंकाळी प्रचार थांबला. यानंतर आता उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात फिरती पथके व स्थिर संनिरिक्षण पथक दक्ष असून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू, भेटवस्तू जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत, असेही आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

Lok sabha : आघाडीच ठरलं ! उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा तगडा नेता मैदानात उतरणार

मतदानाच्या अगोदर तीन दिवसांपासून मतदान समाप्त होण्याआधीच्या ४८ तासापर्यंत उमेदवाराच्या प्रचार मोहिमेची तीव्रता वाढत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कम्युानिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्ट हाऊसची कसून तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मतदारसंघाच्या हद्दीवरील चेक पोस्टच्या माध्यरमातून मतदारसंघात येणाऱ्या वाहनांची तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्ती याच मतदारसंघातील आहेत याची खात्री करण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही माहिती मिळाली तर नागरिकांनी तत्काळ 02162-229605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सीव्हिजील अॅपवरही फोटो व्हिडिओसह तक्रार दाखल करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसं‍हिता कक्षाच्या addcoll.satara@gmail.com या मेल आयडीवर तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार दाखल करता येईल.

भाजपने तोडली सातारा अन् शिरुरची रसद : पवारांच्या शिलेदारांची मुंबईतून कोंडी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज