भाजपने तोडली सातारा अन् शिरुरची रसद : पवारांच्या शिलेदारांची मुंबईतून कोंडी

भाजपने तोडली सातारा अन् शिरुरची रसद : पवारांच्या शिलेदारांची मुंबईतून कोंडी

Shashikant Shinde Amol Kolhe: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe). शरद पवार यांचे दोन वाघ, दोन शिलेदार अशी ओळख. राष्ट्रवादीत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतरही या दोघांनी थोरल्या पवारांसोबतच (Sharad Pawar) राहणे पसंत केले. आता हे दोघेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर शिरुरमध्ये अमोल कोल्हे हे निवडणुकीला उभे आहेत. मात्र या दोघांचीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा डाव शिंदे सरकारने टाकला आहे. पवारांच्या या शिलेदारांना मुंबईतून मिळणारी कथित रसदच शिंदे सरकारने तोडून टाकली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचे आव्हान या दोघांपुढेही आहे.

पाहुया नेमकी शिंदे सरकारने या दोघांची कशी कोंडी केली आहे आणि या कथित रसद कशी तोडली आहे…

गेल्या आठवडाभरापासून नवी मुंबई गुन्हे शाखेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी चौकशी आणि कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने या बाजारातील तगडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक केली आहे. शिवाय अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचे समजते. या कारवाईतून एक प्रकारे शिरूर आणि साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी खेळली गेल्याची चर्चा बाजारात सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांच्या मांडवाखाली वावरणाऱ्या अनेक व्यापारी नेत्यांचा या बाजारांवर प्रभाव राहिला आहे. शशिकांत शिंदे, रवींद्र इथापे, संजय पानसरे, अशोक वाळुंज, अशोक गावडे, शंकर पिंगळे, बाळासाहेब बेंडे, नरेंद्र पाटील, विलास हांडे, अशोक हांडे यासारख्या व्यापारी, माथाडी असलेल्या मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांवर मोठा प्रभाव राखणाऱ्या नेत्यांचा या बाजारांवर अंकुश असल्याचे पाहायला मिळते.

तीनवेळा उमेदवारी दिली पण गद्दारी केली, पृथ्वीराज चव्हाणांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका

राज्यभरातून या बाजार समितीवर शेतकरी गटातून 16 संचालक निवडून येतात. मात्र हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीचे केंद्र असणाऱ्या या बाजारांवर मुंबईतील पाच आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या रूपाने एक माथाडी अशा सहा संचालकांचा दबदबा असल्याचे नेहमीच राहिला आहे. याशिवाय शिरूर आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक मोठा टक्का मुंबईतील या बाजारात आहे. या दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखाने, बागायती पट्ट्यांवर या व्यापाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे.

या बाजारपेठांमध्ये काही वर्षांपूर्वी स्वच्छतागृहांच्या उभारणीचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात घोटाळा झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीमधील अधिकारी आणि इतरही काही संचालकांविरोधात तक्रारी पुढे आल्या होत्या. मात्र सुरुवातीला याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. पण आता अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांना हवी ती रसद या बाजारांमधून पुरवली जात असल्याच्या तक्रारी त्यांचे विरोधक करू लागले होते. सातारा मतदारसंघात तर शौचालय घोटाळ्यावरून शशिकांत शिंदे यांचे विरोधक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील जाहीर वक्तव्य करत होते.

आधी इथेनॉल बंदी उठवली अन् आता कांदा निर्यांत बंदीही मागे… PM मोदींनी महाराष्ट्रातील मतदानापूर्वी घेतले मोठे निर्णय

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग अॅक्टिव्ह झाला आहे. पोलिसांनी बाजारातील बडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक केली आहे. शिवाय अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचे समजते. शिरूर, साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी यानिमित्ताने खेळली गेल्याची चर्चा या बाजारात सुरु झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? शिंदे सरकारने केलेल्या या कोंडीने दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक अवघड जाईल की? ही खेळी भाजपवपच बुमरँग होऊ शकते? हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube