शरद पवार साहेबांचं नेतृत्व दूरदृष्टीचं; अजित पवारांचं वक्तव्य, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार?
पिंपरी चिंचवड येथे प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्या्ची शक्यता असल्याचं वक्तव्य केलं आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune) राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. त्यामुळं पुढच्या काळात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
जे घडलं ते झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलं आहे. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे असं अजित पवार म्हणाले.
केंद्राचं आणि राज्याचं राजकारण महापालिकेत आणायचं नाही. तिथलं राजकारण तिथं ते इथं आणायचं नाही असे अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका आपल्याला संपवायचाय.पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका कोण? असा सवाल करत त्या आकाला संपवायचं आहे, असा एल्गार अजित पवार यांनी केला. पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका आपल्याला संपवायचा आहे. त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची आहे असं अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 25 वर्षांची आमची कारकिर्द पाहा आणि यांची गेल्या 8 ते 9 वर्षांच्या कारकीर्द पाहा असे अजित पवार म्हणाले. आमच्याकडे सत्ता होती तरी आम्ही सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेची मस्ती कधी येऊ आम्ही दिली नाही असे अजित पवार म्हणाले अनेक समाजाला आण्ही प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. आपल्याला पिपंरी चिंचवड शहराला देशातील पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचं आहे असंही ते म्हणाले.
