Lok sabha : आघाडीच ठरलं ! उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा तगडा नेता मैदानात उतरणार

  • Written By: Published:
Lok sabha : आघाडीच ठरलं ! उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा तगडा नेता मैदानात उतरणार

Shashikant Shinde will contest Satara Lok Sabha seat: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. परंतु काही मतदारसंघात आघाडी व युतीचे अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यात सातारा लोकसभा (Satara Lok sabha) ही महत्त्वाची जागा आहे. या जागेवर महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून, मतदारसंघात मेळावे घेत आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधातील उमेदवार देण्याची महाविकास आघाडीची शोध मोहीम अखेर थांबली आहे. येथून शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे
(Shashikant Shinde) यांचे उमेदवारी फिक्स झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा

शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच ते मंत्रीही राहिलेले आहेत. त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. येत्या 15 एप्रिल रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी फाईट होणार आहे.

मोठी बातमी! प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, जन्मठेपेचा निर्णय स्थगित

शशिकांत शिंदे यांनी मारली बाजी
या मतदारसंघात शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील हे आहेत. उदयनराजे भोसले यांचा मागील वेळी पराभव करणारे श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून उमेदवारांची शोध मोहीम सुरू होते. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर या चौघांची नावे चर्चेत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून या नावावर पक्षपातळीवर चर्चा सुरू होती. त्यात शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. कोण लढणार आहेत का बघा? नाही तर मी आहेच, असे त्यांनी सांगितले होते. अखेर त्यांच्याच नावावर शरद पवारांनी शिक्कोमोर्तब केला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांची तयारी पण

या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. ही जागा काँग्रेसला मिळाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांना ही निवडणूक लढण्यास तयार होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते हे पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी राष्ट्रवादीकडून गळ घालण्यात येत होती. यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये बैठकाही झाल्या होत्या. पण पृथ्वीराज चव्हाण हे पंजाच्या चिन्हावर येथून निवडणूक लढण्याची तयारी दाखवत होते. शेवटी एकमत न झाल्याने राष्ट्रवादीने येथून नवीन उमेदवार शोधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज