माढ्याचा तिढा सुटला! अकलूज की फलटण, एकत्र बसून चर्चा करा अन् सांगा : पवारांचे निर्देश

माढ्याचा तिढा सुटला! अकलूज की फलटण, एकत्र बसून चर्चा करा अन् सांगा : पवारांचे निर्देश

सातारा : अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) धैर्यशिल मोहिते पाटील की संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकारांनी अनौपराचिक गप्पा मारताना बोलत होते. (Mohite Patil family and Ramraje Naik Nimbalkar will again join NCP (Sharad Chandra Pawar) party chief Sharad Pawar.)

मोहिते पाटील कुटुंबिय हे सध्या भाजपमध्ये आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार देखील आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. माढ्यातून उमेदवारीसाठी धैर्यशिल मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा भाजपचे माढ्याचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित केली. तेव्हापासूनच मोहिते पाटीलघराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध करत बंडाचे संकेत देण्यास सुरुवात केली होती.

Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट! AlMIM देणार उमेदवार, फटका कोणाला?

या दरम्यान, मोहिते पाटील यांनी तर थेट तुतारीच चिन्ह हाती घ्यावे अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. भाजपकडून जरी उभे राहिला तरी तुम्हाला मतदान करणार नाही, असे कार्यकर्ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसून येत होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला. यात आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चेतवण्याचे काम केले. अशात गत आठवड्यात धैर्यशिल मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार अमोल कोल्हे यांनी एकाच कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे हे दोन्ही नेते लवकरच तुतारी हाती घेणार हे स्पष्ट झाले होते. आता अकलूज की फलटण हा स्थानिक पातळीवर बसून त्यांनी निर्णय करायचा आहे, असे सांगून पवारांनी उमेदवारीचा निर्णय निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या कोर्टात टाकला आहे.

Panjabrao Dakh : पंजाबराव डख यांच्याकडे फक्त 10 हजार रोकड, जाणून घ्या एकूण संपत्ती

साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण की शशिकांत शिंदे?

सातारा लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढण्यास तयार असतील तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अन्यथा आमच्याकडे आमदार शशिकांत शिंदे यांचा पर्याय आहे, असे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले. सातारा मतदारसंघात आघाडीला अजून उमेदवार शोधता आलेला नाही. याआधी शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी तब्येत आणि वयोमान यामुळे निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर दुसरा उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न होता. मात्र, आता पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी चिन्हावर लढण्यास तयार होतील का हाच मोठा प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube