Loksabha Election : शरद पवारांनी चारवेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Loksabha Election : शरद पवारांनी चारवेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Deepak Kesarkar On Sharad Pawar : शिवसेना (Shiv Sena) आजवर चारवेळा फुटली, शिवसेनेच्या फुटीत शरद पवारांचा हात होता, असा गंभीर आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ आज कणकवलीत राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलतांना केसरकरांनी (Deepak Kesarkar) शरद पवारांवर(Sharad Pawar) जोरदार टीका केली.

मोठी बातमी : हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी 

केसरकर म्हणाले, निवडणुकांच्या काळात सभांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक पक्षानं आपापला जाहीरनामा घेऊन जनतेसमोर गेलं पाहिजे. मात्र, काल उबाठाच्या कणकवलीती सभेत फक्त उणीदुण काढली गेली. यापलिकडं काही झालं नाही, असं केसरकर म्हणाले.

पवारांनी सेना फोडली
केसरकर म्हणाले, 1989 साली दिनाबाबा पाटील आमदार असतांना मुलूंडला सभा झाली. त्या सभेत शरद पवार बाळासाहेबांवर बोलले. त्याच मैदानावर बाळासाहेबांनीसभा घेऊन शरद पवारांचं सगळंच बाहेर काढलं. नंतर मनोहर जोशींनी समझोता काढला. त्यानंतर शिवसेना चारवेळा फुटली, त्यात शरद पवरांचा हात होता, असा आरोप केसरकरांनी केला.

एसआयटीची मोठी कारवाई! कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी एचडी रेवन्ना यांना अटक 

केसरकर म्हणाले, ज्यादिवसी कॉंग्रेससोबत युती करायची वेळ,येईल, त्यावेळी मी शिवसेनेची दुकानदरी बंद करेल, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. बाळासाहेंबांना ज्यांनी त्रास दिला, दु:ख दिलं, त्यांच्यासोबत; आज उबाठने युती केली. एकेकाळी पाकिस्तान जिकल्यानंतर मुंबईत फटाके वाजवले जायते, ते बाळासाहेबांनी बंद केलं. मात्र, आज उबाठाने या फटाके वाजणाऱ्यांबरोबर युती केली केल्याची टीका केसरकरांनी केली. त्यामुळं बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे आहेत, असं केसरकर म्हणाले.

वीर सावरकरांविषयी एका मंत्र्याने चुकीचे विधान केले होते, तर बाळासाहेबांनी त्यांचं मुंबईत येणं बंद केलं. मात्र, आज जे सतत सावरकरांविषयी चुकीचं बोलत असतात, त्याच राहुल गांधींना जाऊन आदित्य ठाकरे मिठी मारतात, अशी टीका केसरकरांनी केली.

कोरोनात काळात मोदी सरकारने आणि नारायण राणेंनी बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना दिली. साडेपाच लाख कोटी रुपये खर्च रोजगार निर्माण केला. ही लढाई स्वामिमानी जनेतसाठी राणे लढत आहे. इथं येऊन कुणी कोकणी पुत्राचा अपमान करत असेल, तर ही कोकणी जनता त्याला जशास तसं प्रत्युत्तर देईल, असा इशारा केसरकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज