संजय निरुपम यांची 20 वर्षांनी घरवापसी! का सोडली होती शिवसेना? वाचा सविस्तर
Sanjay Nirupam Again In Shiv Sena : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ती जागा शिवसेनेला गेली. त्यानंतर निरुपम यांनी काँग्रेस पक्षात असतानाही नाराजी व्यक्त करत थेट काही आरोपही केले होते. त्यानंतर निरुपम यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केलं. आता त्यांनी मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निरुपम यांचा हा नव्याने प्रवेश नसून त्यांची घरवापसी आहे.
दोनवेळा जाज्यसभा
संजय निरुपम हे बिहारचे आहेत. त्यांनी बिहारमधील पाटना या शहरातील एएन कॉलेजमधून बीए केलं. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यांनी मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या ‘दोपहर का सामना’ मधून पत्रकारितेला सुरूवात केली. पुढे त्यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे चांगले संबंध निर्माण झाले. त्यांना 1996 ला राज्यसभेची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा 2000 ते 2006 अशी राज्यसभेची संधी मिळाली.
सभा घेण्याचं आश्वासन दिलं पण घेतली नाही
2004 ला लोकसभेची निवडणूक लढवत होतो. त्या निवडणुकीत काँग्रेसकडून सुनील दत्त होते. तेव्हा मराठी भागात नकारात्मक प्रचार सुरू होता. त्यामुळे मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आपण एक सभा घ्या अशी विनंती केली. त्यांनी ती मान्य केली, परंतु सभा घेतली नाही. तसंच, सुनिल दत्त आणि बाळासाहेबांचीही भेट झाली होती. त्यामुळे त्यांच्यात काही चर्चा झाली असेल अस मला वाटल. पुढे दत्त हे तीन साडेतीन लाखाने निवडून यायचे पण त्या निवडणुकीत ते फक्त 38 हजारांनी निवडून आले होते. अशी आठवण निरुपम यांनी एकदा एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.
20 वर्षानंतर घरवापसी
हे सगळे राजकीय मतभेद झाल्याने त्यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसकडून 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईमधून निवडून आले. परंतु, पुढच्या 2014 आणि 2019 या निवडणुकीत त्यांचा सलग दोनवेळा पराभव झाला. यावेळीही त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं ठलवलं होतं. परंतु, ही जागा शिवसेनेला गेल्याने ते नाराज झाले. त्यांनी पक्षावर थेट काही आरोप केले. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबीत केलं. यानंतर संजय निरूपम आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे. यावर बोलताना निरुपम म्हणाले तब्बल 20 वर्षांनी मी घरवापसी करतोय.