संजय निरुपम बाळासाहेब भवनात दाखल; शिंदे गटात प्रवेश करणार?
Sanjay Nirupam : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) बाळासाहेब भवनात (Balasaheb Bhavan) दाखल पोहोचले आहेत. संजय निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील तीन मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सध्या त्यांची बाळासाहेब भवनात बैठक सुरु आहे. शिंदे यांची बैठक सुरु असतानाच संजय निरुपम यांची एन्ट्री झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय निरुपम शिवेसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. संजय निरुपम हे देखील काँग्रेसमध्ये असताना मुंबईत खासदार राहिलेले आहेत. त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. उत्तर, पश्चिम मतदारसंघातून निरुपम इच्छूक होते मात्र, भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. सोबतच स्थानिक भाजप नेत्यांकडूनही त्यांना मोठा विरोध होत असल्याचं दिसून येत होतं.
‘एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा’; विजय शिवतारेंचं राऊतांना ओपन चॅलेंज
या संपूर्ण घडामोडीनंतर आता संजय निरुपम एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर संजय निरुपम मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय निरुपम आपली भूमिका मांडणार आहेत. संजय निरुपम शिंदे गटात आल्यानंतर उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदेंची ताकद वाढणार आहे,त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात संजय निरुपम यांचा प्रवेश झाल्यास त्याचा फायदा शिंदे गटाला नक्कीच होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेत पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला दिल्याने काँग्रेसवर नाराज होते. या जागेचा पुन्हा एकदा विचार करावा यासाठी त्यांनी काँग्रेसला 7 दिवसांचा कालावधी दिला होता. जर या 7 दिवसात काँग्रेसने या जागेसाठी विचार केला नाहीतर मी पक्ष सोडणार अशी घोषणा देखील त्यांनी केली होती मात्र आता काँग्रेसनेच त्यांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने निरुपम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.