‘एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा’; विजय शिवतारेंचं राऊतांना ओपन चॅलेंज

‘एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा’; विजय शिवतारेंचं राऊतांना ओपन चॅलेंज

Vijay Shivtare On Sanjay Raut : पुण्यात कुणीही एक लाख लोकांची जाहीर सभा घेऊन दाखवा, असं ओपन चॅलेंजच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलं आहे. दरम्यान, पुण्यातील रेसकोर्स परिसरात महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत रिकाम्या खुर्च्या असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. त्यावर बोलताना विजय शिवतारेंनी ओपन चॅलेंजच दिलं आहे.

चालकासोबत भांडण अन् अश्लील व्हिडियोजचा पेन ड्राइव्ह; रेवन्ना सेक्स स्कँडल नेमकं काय?

विजय शिवतारे म्हणाले, पंतप्रधान मोदींची सभा जिकडे असते तिकडे एसपीजीची सुरक्षा कडक असते, सभेच्या बाहेर हजारो लोकं बाहेर होती, मोठी सभा झाली आणि मोदी सिद्ध विकासावर बोललेत, पुणेकर कालच्या सभेवर खुश आहेत. काही विरोधक सभेला लोकं पाठवत असतात. जाहीर सभेतून उठून जायचं आणि त्यांचे कॅमेरामन असतात. पुण्यात एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवावी, असं ओपन चॅलेंजच शिवतारेंनी दिलं आहे.

फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा

पुण्यातील सासवडमध्ये जी महायुतीची सभा झाली, त्या सभेसाठी हजारो लोकांची गर्दी होती. संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे, तुम्ही रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवाच, संजय राऊत यांना सिझोफेनियाची लक्षणे दिसतायेत, त्यांना रात्री स्वप्न पडतात, आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्यांनाच कळत नाही, अशी सडकून टीका विजय शिवतारेंनी केली आहे.

दरम्यान, कालच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी लोकं आले होते. विरोधकांनी जर आरोप केले नाहीत तर त्यांचं दुकान कसं चालणार? असा खोचक सवाल करत विजय शिवतारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube