मोठी बातमी : हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात वायूसेनेच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात पाच जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांची शोध सुरू आहे.

वायूसेनेच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी

Air Force convoy attacked by terrorists in Jammu and Kashmir’s Poonch: जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात हवाई दलाच्या ताफ्यातील दोन वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात पाच जवान जखमी झाले आहेत. शनिवारी सांयकाळी ही घटना घडली आहे. हवाई दलाचे दोन वाहने जात असताना दहशतवाद्यांनी वाहनांवर गोळीबार केला आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिस आणि लष्कराने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

follow us