जम्मूच्या दोडामध्ये ढगफुटी, पुरात 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक घरे गेली वाहून, राष्ट्रीय महामार्गही बंद..

जम्मूच्या दोडामध्ये ढगफुटी, पुरात 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक घरे गेली वाहून, राष्ट्रीय महामार्गही बंद..

Jammu-Kashmir Flood: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दोडा जिल्ह्यातील काही भागात झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst) मोठी हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर 15 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. दोडाचे डीसी हरविंदर सिंग यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. ढगफुटीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून सध्या स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

कामगार कायदे ते सहकारी साखर कारखाने; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय! 

मंगळवारी डोडा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीमुळे अचानक पूर आला. पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुरात अनेक पादचारी पूलही वाहून गेले. तसेच यामुळे रस्ते, पूल आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. 10 ते 15 घरे वाहून गेली. महामार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. बाधित भाग रस्त्यापासून तुटलेला आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 40-50 मिनिटे चालत जावे लागते. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात मोठे आव्हान निर्माण होत आहे. ढगफुटीमुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने धोका वाढला आहे.

“तीन लाख ट्रक काढतो अन् फडणवीसांचा बंगला भरून टाकतो”, ओएसडींना जरांगेंनी काय सांगितलं? 

दरम्यान, प्रशासनाने तातडीने एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांना बचाव कार्यासाठी पाठवले आहे. ते टीम बाधित भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवित आहेत. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रभावित भागात अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थाही मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या आपत्तीवर शोक व्यक्त करत प्रभावितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तीन दिवसांपासून सतत पाऊस

दोडा जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीही मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान चारवा आणि रहमान या दोन ठिकाणी ढगफुटी झाले. त्यामुळे तीन पादचारी पूल वाहून गेले आणि अनेक घरांचे नुकसान झाले. त्याच वेळी, चिनाब नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचली आहे.

वाहतूक पूर्णपणे ठप्प
जम्मू आणि काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे वैष्णोदेवी यात्राही थांबवण्यात आली आहे. तसेच भूस्खलन आणि दगड पडल्यामुळे जंगलगवार नाल्यावरील राष्ट्रीय महामार्ग-२४४ (दोडा-किश्तवार) चा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्ता पूर्ववत होईपर्यंत दोडाच्या आयुक्तांनी लोकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

याआधीही झाली ढगफुटीची घटना…
यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी किश्तवार जिल्ह्यातील चासोती गावात ढगफुटीची घटना घडली होती. यामध्ये 65 जणांचा मृत्यू झाला होता आणि 200 जण अजूनही बेपत्ता आहेत. माचैल मातेच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक, त्यांच्या बसेस, तंबू, लंगर आणि दुकाने ढगफुटीमुळे आलेल्या पुरात वाहून गेली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube