सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे 6 जणांचा मृत्यू तर 1200 पर्यटक अडकले

सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे 6 जणांचा मृत्यू तर 1200 पर्यटक अडकले

Sikkim Cloudburst : संपूर्ण देशात मान्सूनचा (Monsoon 2024) आगमन झाला आहे. बहुतेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सिक्कीममध्ये (Sikkim) पावसाने हाहाकार माजवला आहे. माहितीनुसार, सिक्कीममधील मंगन जिल्ह्यात बुधवारी रात्री ढगफुटीमुळे (Sikkim Cloudburst) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे या भागात 220.1 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या ढगफुटीमुळे या भागात 15 विदेशी पर्यटकही तिथे अडकले असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सिक्कीम सरकारकडून देण्यात आली आहे.

1200 हून अधिक देशी पर्यटक अडकले आहेत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगन शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या लाचुंग गावात 1,200 हून अधिक देशी पर्यटक आणि 15 परदेशी नागरिक ( 10 बांग्लादेशी, 3 नेपाळमधील आणि दोन थायलंडमधील) पर्यटकांचा समावेश आहे. हवाई मार्गाने पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी मुख्य सचिव व्हीबी पाठक यांनी केंद्राशी चर्चा सुरु केली आहे.

व्हीबी पाठक म्हणाले, मंगन जिल्ह्यात ढगफुटीमुळे सहा जणांचा मुत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे. सरकारकडून पळसकर येथे मदत शिबीर उभारण्यात आले असून राज्य सरकारकडून पीडित कुटूंबांना मदत जाहीर करण्यात आली आहे तसेच ही रक्कम लवकरात लवकर पीडित कुटुंबांना देण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

व्हीबी पाठक पुढे म्हणाले, सक्रिय भूस्खलनामुळे आम्हाला काही ठिकाणी मदत करण्यास अडचण येत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आम्हाला पाच ते सात दिवस लागणार आहे त्यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हवामानाच्या परिस्थितीनुसार हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची पाठवली आहे. याच बरोबर त्यांनी तलावांना कोणताही धोका नसल्याची ग्वाही दिली.

ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सिक्कीममधील 15 हून अधिक तलावांचे सतत निरीक्षण करण्यात येत आहे. सध्या त्यांना कोणताही धोका नाही. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आणि CDAC राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासोबत काम करत असून महत्वाचा डेटा शेअर करत आहे.

शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर फ्रान्समध्ये सापडली! जाणून घ्या ऐतिहासिक ठेव्यात नेमकं काय

गेल्या वर्षी देखील सिक्कीममध्ये सरोवर फुटल्यामुळे प्रचंड विध्वंस झाला होता. यामध्ये सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. 4 ऑक्टोबर 2023 रोजी ढग फुटले आणि तिस्ता नदीला पूर आला. माहितीनुसार या घटनेत 88 हजार लोक बाधित झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज