राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच! पुढील 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Monsoon Rain Update : महाराष्ट्रात 6 जून रोजी मान्सूनचे (Monsoon Rain Update ) आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात ( Maharashtra ) अनेक भागांमध्ये दमदार पाऊस होत आहे. मान्सूनची राज्यात जोरदार आगेकूच सुरू आहे. त्यानंतर मुंबईसह ठाण्यात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची ( Rain ) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत मुंबई सह ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागाला यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
PM Modi यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंट सुरू; पंतप्रधानपदाच्या हॅट्रीकसाठी मोदी सज्ज
दरम्यान शनिवारी पुणे शहरात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होत आहे. पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात मुसळधार पाऊस झाला. तर वारजे माळवाडी, कोथरुड, घोरपडी, लोहगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याच बरोबर सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचण आली होती.
Today Horoscope : आजचे राशी भविष्य 9 जून 2024, या राशीच्या लोकांनी विनाकारण वाद घालू नये
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचं आज आगमन झालं. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे.
यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.