Download App

बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर राजकारणात सक्रिय…

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजकारणात सक्रिय होणार आहे. सुजात आंबेडकर राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दौऱ्यासोबतच सुजात आंबेडकर येत्या 3 मे रोजी दादरमध्ये एल्गार मेळावा घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांकडून रणनीती आखली जात असल्याचं दिसून येत आहे.

आंदोलक कुस्तीपटूंचे ‘त्या’ अहवालाबाबत गंभीर आरोप…

मध्यांतरी मनसेकडून मशिदीवरील भोंग्यावर आवाज उठविण्यात आला, त्यावेळी सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका मांडली होती. मशिदीवरील भोंगे हटवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. त्यावर आधी अमित ठाकरेंना भोंगे काढण्यासाठी पाठवा, असं आव्हान देत सुजात आंबेडकर थेट राज ठाकरेंनाच भिडल्याचं दिसून आलं होतं.

भारताशी दोन हात करण्याची आमची कुवतच नाही; पाकच्या लष्करप्रमुखांची कबुली

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नेमक्या कोणत्या पक्षासोबत जाणार? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच बाळासाहेब आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर अखेर ठाकरे गट आणि वंचित आघाडी आगामी निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही करण्यात आली.

राऊतांचा फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर इशारा!

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीने एमआयएम पक्षाशी युती करुन वंचित आणि मुस्लिम समाजाची मते मिळवली होती. राज्यातल्या अनेक मतदारसंघात वंचित-एमआयएमने उमेदवार उभे केल्याने याचा राष्ट्रवादी-काँग्रेसला फटका बसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप राष्ट्रवादी-काँग्रेसकडून करण्यात आला.

आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत युती करुन निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट झालं असून अद्याप वंचित हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार का? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे कारण आमची युती ठाकरे गटाशी असून राष्ट्रवादीशी नसल्याचं बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर भविष्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडी असो किंवा नसो, ठाकरे गटाशी वंचितशी युती असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीलाच होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सुजात आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. बाबासाहेबांनतर आंबेडकर घराण्याला राजकारणात फारसे यश आल्याचा इतिहास नाही पण सुजात आंबेडकरांच्या रुपात आंबेडकरी समाज एकवटणार असल्याचं बोललं जातंय.

Tags

follow us