Download App

वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार; निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब

वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्हावर निवडणूक लढवता येणार, केंद्रीय निवडणुक आयोगाची तशी घोषणा.

  • Written By: Last Updated:

Vanchit Bahujan Aghadi symbol : प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली. (Vanchit Bahujan Aghadi) परंतु, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यात होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्याने ते काहीही बरळतात; वंचितचा हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मागे नाही. केंद्रीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह दिल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनेही आपापल्या स्तरावर तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुका लढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नवं चिन्ह दिल्याने उत्साह वाढला आहे.

वंचित बहुजन आघाडीने २५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचं दिसलं. राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही चांगली बाब मानली जात आहे.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्वत: उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, नेमक काय म्हणाले?

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधासभा निवडणुकांत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी त्यांनी सर्व ठिकाणी एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे.

follow us