धुळ्यात मतदानाच्या दिवशीच मोठा गोंधळ; मतदान केंद्रात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीने खळबळ

मतदान केंद्रातील मतदान यंत्राची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना उघडकीस येताच मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

धुळ्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड; भाजपच्या उमेदवारावर आरोप

धुळ्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड; भाजपच्या उमेदवारावर आरोप

Vandalism of EVM machine kept in polling booth causes stir : धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमची तोडफोड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मतदान केंद्रातील खोली क्रमांक 1 मध्ये असलेल्या ईव्हीएमची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना उघडकीस येताच मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही काळासाठी मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली असून, मतदारांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, या प्रकरणामागे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला आहे. महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे काही कार्यकर्ते जबरदस्तीने खोली क्रमांक 1 मध्ये घुसले, तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि ईव्हीएमची तोडफोड केली. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणारा असून, निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली; राज ठाकरे संतापले

या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवडणूक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सतीश महाले यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मतदान केंद्रावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असून, तोडफोड झालेल्या मतदान यंत्राबाबत तांत्रिक तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पुढील कारवाई आणि चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version