Download App

‘…तर आम्ही कंत्राटी कामगारांना पर्मनंट करणार’; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेक जण ‘पर्मनंट’ होण्याची वाट बघत आहेत. अनेकांची वयोमर्यादा संपली आहे, मात्र त्यांना कायमस्वरुपी नोकरीवर घेतलेले नाही. हे सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेणारही नाही.

नांदेड : 46 मृत्यू, डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा अन् केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाला क्लीनचिट!

आम्ही सर्व वर्गातील आणि वर्ग तीन व चारमधील कंत्राटी कामगारांना असे आवाहन करत आहोत की, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली, तर शासकीय व्यवस्थेतील हे चातुर्वर्ण्य मोडीत काढले जाईल. कंत्राटी कामगार भरती बंद करून सर्व कंत्राटी कामगारांना कायमसेवेत घेतले जाईल हा आमचा निवडणुकीचा जाहीरनामा असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

‘प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही’; काँग्रेस खासदाराने खरं सांगूनच टाकलं

पूर्वीच्या काळात असलेली चातुर्वर्ण व्यवस्था याही काळात सरकारी यंत्रणेत राबवली जात असल्याचं दिसून येत आहे. पूर्वी जसं चातुर्वर्णातील सर्वात खालच्या वर्णाला, शूद्र अतिशूद्र यांना कुठलीही सामाजिक आर्थिक सुरक्षितता देण्यात येत नव्हती, त्याच पद्धतीने आता सरकार वर्ग तीन आणि वर्ग चारची पद ही कंत्राटी पद्धतीने भरून या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेत ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, कामगारांनी आत्तापर्यंत अनेक सरकारं पाहिली, राष्ट्रवादी-काँग्रेस त्यानंतर भाजप-शिवसेना, त्यानंतर शिंदे गट-भाजप पण कंत्राटी कामगारांना पर्मनंट केलेलं नाही. सध्याच्या शिंदे सरकारने 9 खासगी कंपन्या कंत्राटी भरतीसाठी नेमल्या असल्याचाही आरोप प्रकाश आंंबेडकरांनी यावेळी केला आहे.

follow us