Download App

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

  • Written By: Last Updated:

नागपूर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे ही धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली होती. यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. राज मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून अटक केली होती.

लखनौ आणि गोंडा या दोन RSS कार्यालयांना बॉम्बने स्फोटाची धमकी देण्यात आली होती. राज मोहम्मद याने फोनवरून उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांसह एकूण 6 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. पोलिसांनी आरएसएस कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे.

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

Tags

follow us