Download App

अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

7 devotees died after a tree fell on the temple shed in Paras village : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj temple) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळंच लिंबांच मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मतकार्य सुरू होतं.

मिळालेल्या माहितीनुसार बाबजी महाराज मंदिरात काल रात्री आरतीचं आयोजन केलं होतं. या रोज होणाऱ्या आरतीला मोठ्या प्रमाणावर गावकरी मंडळी उपस्थित होते. आरती सुरू असतांनाच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक हे मंदिरात आले. सर्वजण मंदिरात दाटीवाटीने उभे राहुन आरती करत होते. इतक्यात मंदिरा जवळ असलेलं लिंबाचं झाड मंदिराच्या टीन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने शेड खाली आली आहे. त्यात भाविक दबले गेले. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते.

Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनांच एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. यावेळी जेसीबाच्या मदतीनं मातिचा ढिगारा हटवण्याच काम करण्यात आलं. पावसामुळं झालेला चिखल, वादळी वारा, अंधार यामुळं बचावकार्यात अडथळा येत होतो. मात्र, बचाव पथकाने झाड हटवून लोकांना बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली. या टीनच्या शेडखाली 7 जणांचा मृत्यू झाला. तर शेडखालून 30 ते 35 जखमींना बाहेर काढण्यात आलं. यातील काही भाविकांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यानंतर मंदिर परिसरात एकच आक्रोश आणि रडारड सुरू झाली. त्यानंतर या सर्वांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी काहींना किरकोळ मार लागला होता. त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तर 29 जणांना गंभीर मार असून त्यांच्यावर अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अतुल कासरे, विश्वनाथ तायडे, पार्वतीबाई महादेव सुशील, भास्कर आंबीलकर, उमा खारोडे, अशी मृत व्यक्तींची नावे असून काहीचे नावे अद्याप कळू शकती नाहीत.

दरम्यान, आता आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत दुर्घटनेतील मृतकांचया नातेवाईकांना मदत जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, पारस जि. अकोला येथे बाबजी महाराज मंदिरात आरती चालू असतांना टिन शेडवर झाड कोसळून अनेक भाविक जखमी तसेच चार भाविक मृत्युमुखी पडल्याची दु:खद बातमी समजली, सरकारने यांची गांभीर्याने दखल घेऊन मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ भरघोस मदत जाहीर करावी, असं टि्वट केलं.

Tags

follow us