Download App

कापूस उत्पादक शेतकरी कोंडीत, दरवाढीची अपेक्षा भंगली

  • Written By: Last Updated:

Cotton rates :  मागचा हंगाम संपून आता पुढचा येऊ घातला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडलेलेच असून, किंचित चढउतार होत आता कमाल ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाली. यापूर्वीच्या हंगामात कापसाच्या दराने चार दशकाचा उच्चांक मोडला होता. त्यामुळे कापसाचे दर (Cotton rates) वाढतील अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली होती. परंतु, कापसाचे दर वाढले नसून उलट घसरले. या घसरणीच्या दरात कापूस विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ येऊन अपेक्षा भंग पावली आहे. शेतकऱ्यांचे क्विंटलमागे किमान एक हजार रुपयाचे नुकसान होत आहे. आता पावसाने हजेरी लावली. त्यामुळं बी-बियाने खरेदीसाठी शेतकऱ्याला कापूस विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. (A loss of at least one thousand per quintal is the time to sell cotton at falling rates)

दरम्यान, दरात सुधारणेची वाट पाहत शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. आजही १५ टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. परंतु, आता दरवाढीची मुळीच शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी थप्पीला असलेला कापूस विक्रीला काढला आहे. अख्ख्या हंगामभर दर वधारण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांचा अखेर भ्रमनिराश झाला. दरम्यान, येणाऱ्या खरीप हंगामातील कापसाच्या दराचा अंदाज बांधता येत नसला तरी यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारीमध्ये अकोट बाजार समितीत कापसाच्या भावात किंचित वाढ नोंदविली गेली. कापसाला ८ हजार २१५ ते ८ हजार ८६० रुपयांपर्यंत भाव होता. या किंचित वाढलेल्या दराने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. हंगामाची सुरूवात म्हणून कदाचित कापसाला दर नसावेत असा शेतकऱ्यांचा कयास होता. मध्य आणि हंगामाच्या अंतिम टप्यात कापसाच्या दरात मोठी उलथापालथ होईल, शेतकऱ्यांचा समज होता. परंतु, हा समज आता गैरसमजामध्ये परिवर्तीत झाला आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात प्रारंभापासूनच कापसाचे दर दबावात होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या दरात किंचित सुधारणा झाली. ८० ते ८५ रुपये प्रतिक्विंटलने दर वधारले. शेतकऱ्यांना किमान १० हजार रुपये दर मिळतील, अशी अपेक्षा होती. हंगामाच्या आरंभापासूनच कापूस बाजार कधी किंचित तेजीत तर कधी मंदीत होता. जूनमध्ये तर कमाल दर साडेसात हजारावर स्थिरावले आहेत. हंगाम संपल्यानंतरही दर वाढले नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

राज ठाकरेंनी मराठी युवकांसाठी लिहिलं CM शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी 

नुकसान सहन करुन काढला कापूस विक्रीस
दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस थप्पीला लावून ठेवला होता. परंतु, त्याचा परिणाम दर्जा आणि वजनावर होत असल्याने शेतकऱ्यांनी हळूहळू कापसाची विक्री केली. परंतु, सधन शेतकऱ्यांच्या घरात आजही कापूस असून, त्यांनी तो विक्रीस काढला आहे.

शेतकऱ्यांवर दुहेरी मार
यंदा कापूस उत्पादनात मोठी घटच नसून, उत्पादन जेमतेम आहे. गेल्या हंगामात एकरी ९ ते १० क्विंटलवर असलेले कापसाचे उत्पादन यंदा एकरी ५ ते ६ क्विंटलवर आले आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी तर दुसरीकडे भाव नाही, असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना यावर्षी बसला आहे.

दरम्यान, अपेक्षेने घरात थप्पीला असलेला कापूस आता घरात ठेवणे फायद्याचे नाही. कारण पावसाचे आगमन झाले. जोरदार पाऊस पडण्यापूर्वी तो विक्री केला नाही तर पावसाळ्यात भाव पडतील. त्याला ओलसरपणा येऊन त्याची जिनिंग होणार नाही. तसेही मे-जूनमध्ये जिनिंग कामगार घरी परततात. त्यामुळे आता दरवाढ होईल, अशी आशा करणेच व्यर्थ असल्याचे म्हणत थप्पीला असलेला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे.

Tags

follow us