डॉ. आंबेडकरांच्या चिंता अन् विचार प्रक्रिया संघासारख्याच; माजी राष्ट्रपती कोविंद यांचं मोठं विधान
माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.

आज दरवर्षीप्रमाणे विजयादशमीला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा आयोजीत करण्यात आला होतो. (RSS) आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद विशेष अतिथी होते. यावेळी त्यांनी संघातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. माझ्या जीवनात या दोन महान व्यक्तींच विशेष योगदान राहिलं आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत, तर डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी देशाला समृद्ध संविधान दिलं. त्यामुळे मी एक सामान्य माणूस असूनही देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचू शकलो असं रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.
विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी, मोहन भागवतांनी केलं गांधींचं स्मरण
डॉ. आंबेडकरांच्या चिंता आणि विचार प्रक्रिया डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्याच होत्या. डॉ. आंबेडकरांनी ज्या प्रमाणे समाजाच्या सर्व वर्गांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तसच संघाने सुद्धा एकात्मता स्त्रोत्राच्या माध्यमातून हाच संदेश दिला. संघाचा समावेशी दृष्टीकोन याचं प्रमाण आहे असं रामनाथ कोविंद म्हणाले. आपल्या या एकतेच्या आधाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (inherent cultural unity) म्हटलं आहे’ असं कोविंद म्हणाले.
1991 साली ते कानपूरच्या घाटमपुर विधानसभा क्षेत्रातून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढत होते. त्यावेळी ते भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान संघाचे अधिकारी आणि स्वयंसेवकांशी त्यांचा संबंध आला होता. संघाच्या लोकांनी कुठलाही जातीय भेदभाव न बाळगता प्रचार केला होता असंही कोविंद म्हणाले. संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही, संघ सामाजिक एकतेचा पक्षधर आहे असं कोविंद यांनी सांगितलं.