Download App

नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, 6 ठार, एकाच कुटूंबातील पाच जणांवर काळाचा घाला

A speeding car collided with a bus, six people from the same family died tragically : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर (Nagbhid-Nagpur highway) शनिवारी खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. किन्ही गावाला पत्नीला आणायला जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. नागभीड-नागपूर महामार्गावर कानमपा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात अतिरक्तस्त्रावामुळे पाच जणांचा जागीच करूण मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला

मृतांमध्ये एका चिमुलकलीसह चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच नागपूर जिल्ह्यातील आणि एक भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची ओळख पटवली.

जेव्हा पोलिसांनी मृतकांना कारमधून बाहेर काढले, तेव्हा उपस्थितांचे डोळे भरून आले होते.

रोहन विजय राऊत (वय-30), ऋषिकेश विजय राऊत (वय-24), गीता विजय राऊत (वय-45), सुनीता रूपेश फेंडर (वय-40), प्रभा शेखर सोनवणे (वय-36) आणि यामिनी रूपेश फेंडर (वय-9) ही मृतांची नावे आहेत.

Tags

follow us