अकोला महानगरपालिकेत गदारोळ ! महापौरांकडून 16 नगरसेवक तडकाफडकी निलंबित

Akola Municipal Corporation-निलंबित झालेले नगरसेवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे आहेत.

Akola Muncipal Corporation

Akola Muncipal Corporation

Akola Municipal Corporation : अकोला महानगरपालिकेच्या (Akola Municipal Corporation) अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर महापौर शारदा खेडकर यांनी तब्बल 16 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करत मोठा दणका दिलाय. निलंबित झालेले नगरसेवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे आहे. या नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

शहरातील घंटागाड्या मोफत सुरू ठेवण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी केली होती. त्यावर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांना असंविधानिक शब्द वापरल्याने वाद सुरू झाला. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना-ठाकरे गट आणि वंचितचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी थेट महापौरांच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. तब्बल अर्धातास हा गोंधळ सुरू होता.


50 खोके एकदम ओकेच्या घोषणा

अर्थसंकल्पावर बोलू न दिल्याने वंचित, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नगररसेवक आक्रमक झाले. त्याचवेळी वंचितच्या नगरसेवकांनी सभेमध्ये 50 ओके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्यानंतर विरोधी नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या दिला. आकाश कवडे, झिशान हुसन, पराग गवई, निलेश देव यांच्यासह सोळा नगरसेवकांनी ठिय्या दिला होता. यावेळी सभागृहात नगरसेवक आक्रमकझाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी माफी मागावी, असा हट्ट विरोधकांनी लावला होता. जास्त गोंधळ सुरू झाल्यानंतर 16 नगरसेवकांनी महापौर यांनी निलंबित केले.


निलंबनानंतर ठिय्या, थेट पोलिसांची मध्यस्थी

निलंबित झाल्यानंतर नगरसेवकांचा ठिय्या सुरू होता. अखेर सभागृहात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. महापौरांच्या आदेशानंतर 16 नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढण्याय आले.

Exit mobile version