नागपूर : भाजपचे चाणक्य म्हणून परिचित असलेले तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.दरम्यान शहा शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शहा विशेष विमानाने गुवाहाटीवरून नागपुरला पोहोचले. पुढील दोन दिवस ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. शुक्रवारी रात्री ते नागपूर येथे दाखल झाले. ते आज सकाळी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रेशीमबागेतील स्मृती भवन येथे ते भेट देणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौरा निमित्त भाजपकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान आगामी काळात लोकसभा, विधानसभा, नागपूर महानगर पालिका निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. त्यादृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Nitesh Rane : इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले
असा असणार आहे नागपूर दौरा : शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली अर्पण करणार केल्यानंतर रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृति मंदिराला भेट देतील. त्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पुण्याला जाणार आहेत.