Download App

Amravati : वादळाने मंडप कोसळला; भाजपचे खासदार, आमदार बचावले

  • Written By: Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सरकारी योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दरम्यान जोरदार वादळ आले. या वादळात मंडळ कोसळला. त्यात भाजपचे (Bjp) खासदार, आमदार, स्थानिक नेते, पदाधिकारी हे अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मी धमक्यांना भीक घालत नाही, ज्यांना धमक्या येतात ते पक्ष सोडतात, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नांदगाव पेठ येथे भाजपच्या वतीने मोदींच्या विकासासार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे,आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटेसह भाजप नेते उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होत असतानाच मात्र अचानक सुसाट वारा आला. त्यामुळे वादळी वाऱ्याने पूर्णपणे मंडप खाली कोसळला आहे. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर

या मंडपाखाली नितेश राणे, अनिल बोंडे हे अडकले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंडप उचलून या नेत्यांना यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र या ठिकाणी मोठी घटना टळली. या मंडप कोसळल्यानंतरही मात्र भाजपच्या नेत्यांनी एक छोटा कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी नेत्यांनी मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसार केला आहे.

Tags

follow us