अमरावती पदवीधर; माजी मंत्र्यांची कन्या, खासदार बोंडेंच्या बहिणीत अटीतटीची लढत ? की पुन्हा अपक्ष रिंगणात

Amravati Teachers Constituency Election: काँग्रेसकडून प्राध्यापक आदिती पोहरे या रिंगणात उतरू शकतात. त्यांचे तिकीट फिक्स मानाले जात आहे.

Amravati Techer

Amravati Techer

Amravati Teachers Constituency Election : साल 2020. निवडणूक होती अमरावती शिक्षक मतदारसंघांची. मतदार असलेल्या शिक्षकांची घरी थेट पैठणी साडी गेली होती. एक प्रकारे हे निवडणुकीतील हे लक्ष्मीदर्शनच होते. आता हे आठवण्याचे कारण म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहे. माजी मंत्र्यांचे मुलगी, विद्यमान आमदार, भाजपकडून कोण इच्छुक आहेत हे पाहुया..

जुनीच लढत पुन्हा होणार का ?
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे. अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक हे मतदार आहेत. गेल्या वेळची निवडणूक गाजली होती. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. देशपांडे हे महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात होते. पण देशपांडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. देशपांडे यांना 6 हजार 452 मते मिळाली होती. तर अपक्ष किरण सरनाईकांनी 15 हजार 606 मते घेतली होती. आता पुन्हा दोघेही निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. परंतु पक्ष वेगळे असू शकतात. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे तीन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. ते शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेही शिंदे यांचात शिवसेनेकडून लढण्याचा इच्छुक आहेत. तिकीट न मिळाल्यास दोघेही अपक्षही रिंगणात उतरू शकतात.

काँग्रेसकडून माजी मंत्री देशमुखांच्या मुलीला तिकीट ?
काँग्रेसकडून प्राध्यापक आदिती पोहरे या रिंगणात उतरू शकतात. त्यांचे तिकीट फिक्स मानाले जात आहे. आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत. तर देशोन्नती वृत्तपत्राचे मालक व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत.

भाजपकडून बोंडेच्या बहिणीला तिकीट ?
भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. अमरावतीचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, शेखर भोयर, डॉ. सुमित पवार यांची नावे चर्चेत आहेत. संगिता शिंदे या भाजपा शिक्षक आघाडीच्या विभाग संयोजक आहेत. तर पवार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी संगिता शिंदे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

ठाकरेसेनेकडून दत्तात्रय लहाने रिंगणात
इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चित्र अधिक स्पष्ट आहे. पक्षाने प्रा. दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून दिलीप कडू रिंगणात उतरू शकतात. ते दीड वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत.

एकंतरीत या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहेत. त्यातून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरून बाजी मारू शकतो. हे मागील निवडणुकीत दिसून आले आहेत. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची चुरशीची होऊन लक्ष्मीदर्शन होऊ शकते हे नक्की.

Exit mobile version