Shyam Manav : अनिसच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर बदनामी सुरुच, फोनद्वारे शिवीगाळ

नागपूर : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav)यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats)देण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Committee)राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावर (Socal Media)बदनामी करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं […]

Untitled Design   2023 01 28T192548.091

Untitled Design 2023 01 28T192548.091

नागपूर : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav)यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats)देण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Committee)राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावर (Socal Media)बदनामी करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं समोर आलंय.
YouTube video player
अनिसचे हरिश देशमुख (Harish Deshmukh)यांनी सांगितलं की, रोज अनिसच्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येतात, त्यांचं प्रबोधन आम्ही करत असून आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून धर्माच्या नावावर सुरु असलेल्या बुवाबाजी विरोधात असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

देशमुख म्हणाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदू धर्माविरोधी असल्याची अफवा पसरवून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचं काम केलं जात आहे. त्यातून चिडलेले नागरिक आम्हाला आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवरुन अश्लील शिवीगाळ करताहेत. आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे. तरीही आम्ही सर्व संयमानं सर्वांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत, या धमक्यांमुळं आम्ही घाबरणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय.

श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील तरुणाला अटक केल्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत नागपूर पोलिसांनी वाढ केलीय. त्या तरुणाच्या अटकेनंतर नागपूर पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली आहे. पुण्यात श्याम मानव यांचा मुलगा राहात असलेल्या ठिकाणीही सुरक्षा वाढवलीय.

Exit mobile version