Download App

‘तुम्हीच मूर्ख आहात का?, भर कार्यक्रमात शिवव्याख्याता भाजप खासदाराला भिडला

  • Written By: Last Updated:

अमरावती : अमरावतीत नुकताच शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे संघटक – शिवव्याख्याते तुषार उमाळे (Tushar Umale) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोंडेनी उमाळेंना तू मूर्ख आहेस का? असं विचारलं. त्यावर तुषार उमाळे देखील भडकले आणि त्यांनी देखील, तुम्ही मूर्ख आहात का? असं त्यांना उलट विचारलं. भर कार्यक्रमात एकमेकांना अरेरावीची भाषा केल्यामुळे या कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

19 फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंतीचे औचित्य साधून अमरावतीमध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खासदार अनिल बोंडे आणि प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते तुषार उमाळे उपस्थित होते. यावेळी उमाळे भाषण करत असताना, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होते.

https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले याविषयी बोलत होते. तेव्हा मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या बोंडे यांनी भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला. ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का? हे बंद कर, असं बोंडे हे उमाळे यांना म्हणाले. यावेळी तुषार उमाळे यांनीही, ‘तुम्ही मुर्ख असाल’, असे बोंडे यांना म्हटले. या प्रकारानंतर अनिल बोंडे यांना संताप अनावर झाला. ते उमाळे यांच्यावर धावून गेले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ आणि काहीसा तणाव निर्माण झाला होता. पण उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत, परिस्थिती नियंत्रणात आणली.

Anushka Motion Pictures : ‘कालसर्प’चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान

अनिल बोंडे पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसल्यानंतर उमाळे यांनी भर मंचावरून अनिल बोंडे यांना सुनावलं. तुम्ही लोकप्रतिनिधी असा किंवा कोणीही. असा आगाऊपणा खपवून घेतल्या जाणार नाही. महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे. ज्याला ऐकायचं तो ऐकेल. ज्याला नसेल ऐकायचं ते चुपचाप निघून गेले तरी चालेल.

दरम्यान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडिलधारी आहात, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधण आणणार, अशा शब्दांत उमाळे यांनी बोंडे यांना सुनावलं.

पोलिसांनी आणि आयोजकांनी तात्काळ मध्यस्थी करत दोघांचीही समजूत घालत कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. मात्र, या घडलेल्या प्रकाराची चर्चा अमरावतीत होत आहे. सध्या या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

Tags

follow us