बुलढाणा : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. त्यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बुधवारी आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. या अपघाताला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बच्चू कडूंचा अपघात झाला आहे की, सत्ताधाऱ्यांनी घडवून आणलेला घातपात आहे? याची चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी स्टेटमेंट केलं होतं. होत नसेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका पण खोटं बोलू नका. बुधवारी त्यांचाही अपघात झालाय. बुलढाण्याच्या माँ जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजा येथे गेले होते. ज्या दिवशी सुनावणी होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळेल. यावेळी अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्यांचा देखील समाचार घेतला तर शिवसेना फोडण्याचं भाजपचं मिशन पूर्ण झालं आहे. या गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरुन त्यांचे आभार देखील मानले आहे.