Download App

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? बावनकुळेंचा कोंडी करणारा सवाल

Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटत आहेत. खर्गेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून खर्गे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. आताही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule) यांनी या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर सवाल विचारत उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक

बावनकुळे म्हणाले, आमचा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. कारण उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांचे राज्यकर्ते, पुरस्कर्ते म्हणून वल्गना करतात पण कालपासून उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंना इंडी आघाडीत राहायचं आहे आणि काँग्रेसने हिंदुत्वाच्या विरोधात काही केलं तर उद्धव ठाकरे सहन करायला तयार आहेत. उद्धव ठाकरेंना आमचा सवाल आहे की प्रियांक खर्गेंनी सावरकरांचा जो अपमान केला तो त्यांना मान्य आहे का? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत, असे बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले होते प्रियांक खर्गे ?

ज्या कुणाची विचारधारा द्वेष आणि विभाजनाला खतपाणी घालत असेल त्याला विधानसभेत स्थान मिळायला नको. जर भाजपला यात काही समस्या वाटत असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. सावकरांचं योगदान काय आहे. सावरकरांना वीर ही उपाधी कशी मिळाली याचं उत्तर भाजपनं द्यावं. इंग्रजांकडून सावरकर पेन्शन घेत नव्हते हे देखील भाजपनं सांगावं, हे माझे व्यक्तिगत विचार आहेत सरकारचे नाही असे मंत्री खर्गे म्हणाले होते.

follow us